इयत्ता १२ वी ॲडमिशन नोटीस (2023-24)

(शैक्षणिक वर्ष २०२३-२४ इयत्ता १२ वी प्रवेश प्रक्रिया केवळ मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, पुणे-५ येथून उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच)

  • शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीची इयत्ता १२ वीची प्रवेश प्रक्रिया दि. ०८/०५/२०२३ पासून सुरु होईल.
  • मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, कनिष्ट महाविद्यालय, शिवाजीनगर,पुणे ५ येथून इयत्ता ११ वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या लिंकवर mcs.vriddhionline.com वर जाऊन User Id व Password प्राप्त करून घ्यावा.  
  • ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्यासाठी कृपया मोबाईल फोन अथवा टॅब वापरू नये.
  • विद्यार्थी वृद्धी सॉफ्टवेअर मध्ये प्रथमच प्रवेश फॉर्म भरत असेल तर login मेनू मध्ये जाऊन student Register select करावे.
  • विद्यार्थी प्रथमच Register करत असेल तर आपला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी registration process करण्यासाठी वापरावा. तो टाकल्यानंतर registered मोबाईल नंबर वर OTP येईल. आपणास OTP आला नाहीतर महाविद्यालयामध्ये येऊन चौकशी करावी. हा registered मोबाईल नंबर व ई-मेल आयडी महाविद्यालय तुमच्याशी होणाऱ्या संपर्कासाठी वापरणार आहे याची कृपया नोंद घ्यावी.
  • तुमचे registration यशस्वी झाल्यानंतरच तुम्हाला Registration Id व Login ID म्हणून वापरण्यात येणार असल्यामुळे तो जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांनी दि. ०८/०५/२०२३ पासून दि. १६/०५/२०२३ या कालावधीत प्रवेशाच्या वेबसाइटवरील लिंकवर प्रवेश अर्जाची माहिती इयत्ता १० वी च्या शाळा सोडल्याच्या दाखल्याप्रमाणे बिनचूक भरावी. तसेच स्वत:चा लेटेस्ट फोटो, सही, इ.११ विचे निकालपत्र आणि आधारकार्ड अपलोड करावे.
  • ॲडमिशन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी इ. ११ वी ला ज्या विषयाप्रमाणे परीक्षा दिलेली आहे त्याच विषयाची निवड इ. १२ वीचा ॲडमिशन फॉर्म भरताना करावी. कोणत्याही विद्यार्थ्याने पूर्व परवानगीशिवाय विषय बदलू नये.
  • वरील कालावधीमध्ये परिपूर्ण भरलेला फॉर्म कनिष्ट महाविद्यालयातील संबधित शाखा लिपिकाकडून ऑनलाईन तपासल्यानंतर ॲडमिशन फॉर्म तपासल्याचा SMS मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन फी भरता येईल.
  • विद्यार्थ्यांनी फी भरल्यानंतर ॲडमिशन फॉर्म, भरलेल्या फी चलनाची प्रत, इ. १० वी व ११वीच्या गुणपत्रिकांची छायांकित प्रत, आधारकार्ड छायांकित प्रत इ. सर्व कागदपत्रे महाविद्यालयाच्या कार्यालयात जमा करावा.
  • ॲडमिशन फॉर्म फी चलनासह कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यालयात गुरुवार, दि. २५.५.२०२३ रोजी खालील वेळापत्रकाप्रमाणे जमा करावा व ॲडमिशन फॉर्म जमा केल्याची सही करावी. यानंतरच आपली प्रवेशाची प्रक्रिया पुर्ण होईल याची नोंद घ्यावी.
  • कृपया एकदा Registration केल्यानंतर पुहा Registration Process करू नये.

ॲडमिशन फॉर्म व कागदपत्रे जमा करण्याचे वेळापत्रक

Sr No FACULTY DIV. TIME Hall No.

1

SCIENCE

C
D
E
F

10.30 am To 11.30 am
11.30 am To 12.30 pm
12.30 pm To 1.30 pm
2.30 pm To 3.30 pm

414

2

COMMERCE

G
H
I
J

10.30 am To 11.30 am
11.30 am To 12.30 pm
12.30 pm To 1.30 pm
2.30 pm To 3.30 pm

425

3

ARTS

A
B
K

10.30 am To 11.30 am
11.30 am To 12.30 pm
12.30 pm To 1.30 pm

422